– भंडारा जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन यांचे कर्मचाऱ्यांना आवाहन
हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी येत्या १० ऑक्टोबर रोजी चामोर्शी (जि. गडचिरोली) येथे आयोजित भव्य कर्मचारी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन/कामगार सेना (नोंदणी क्र. ५८२५) भंडाराचे जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन यांनी केले आहे.
हा मेळावा १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता चामोर्शी येथील नगरपरिषद सभागृहात संघटनेचे राज्याध्यक्ष विलास कुमरवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य सरचिटणीस दयानंद एरंडे, नागपूर विभागीय अध्यक्ष ठाकूरदास गवारे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य वैशाली तावडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न आणि न्याय्य हक्कांवर या मेळाव्यात मंथन होणार आहे. या मेळाव्याचे नियोजन गडचिरोली जिल्हा शाखेचे प्रसिद्धी प्रमुख प्रदीप तुपट, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश सिडाम, जिल्हा उपाध्यक्ष योगेश ढोरे, जिल्हा सचिव सुनील गेडाम व महिला प्रसिद्धी प्रमुख गीता कुऱ्हाडकर यांनी केले आहे.
सदर मेळाव्याला भंडारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून एकजूट दाखवावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, जिल्हा कार्याध्यक्ष रामलाल बिसेन, जिल्हा सचिव सचिन आकरे, जिल्हा संघटन प्रमुख खेमराज शरणांगत, प्रसिद्धी प्रमुख शैलेश चंद्रिकापुरे, मारुती चेटुले, तालुका अध्यक्ष संतोष पंचबुद्धे, तालुका सचिव मुरलीधर उरकुडे, रोशन मरसकोल्हे, उपाध्यक्ष शेरू चामट, ज्ञानेश्वर मेश्राम व कोषाध्यक्ष संदीप बनकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.








