spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ऑनलाइन घातक शस्त्र खरेदी प्रकरणी १९ वर्षीय तरुण अटकेत

 

अमरावती १३ : ब्लू डार्ट कुरिअरद्वारे ऑनलाइन घातक शस्त्रे मागवून शहरात विक्री करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट-२ ने रंगेहाथ पकडले. आरोपी ऋषी शंकर गोहर (रा. बेलपुरा) याच्याकडून सात घातक शस्त्रे, मोबाईल फोन आणि १० हजार रुपये किमतीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.

गोपनीय माहितीच्या आधारे ११ ऑगस्ट रोजी पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकला असता, एक लोखंडी तलवार आणि एक विळा आढळला. मोबाईल तपासणीमध्ये त्याने ‘टॅक्टॉय’ या ऑनलाइन साइटवरून तीन चाकू मागवल्याचे समोर आले. पोलिसांनी भूमिपुत्र कॉलनीतील ब्लू डार्ट कार्यालयातून हे चाकू ताब्यात घेतले. तपासात आरोपीने यापूर्वीही दोन चाकू मागवल्याचे उघड झाले.

या प्रकरणी आरोपीसह, शस्त्रे पाठवणारा राजस्थानचा भरत नवाझी, शिपर कंपनीचा मालक, गुरुग्राम येथील ब्लू डार्ट सुरक्षा व्यवस्थापक आणि अमरावती शाखा व्यवस्थापक यांच्याविरुद्ध शस्त्रास्त्र कायदा व एमपीडीए अंतर्गत राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली. पोलिसांनी नागरिकांना बेकायदेशीर शस्त्रे खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे.

Popular Articles