रामटेक १३ :- दुधाळा-बार्शीकडे जाणारी रामटेक आगाराची राज्य परिवहन महामंडळाची बस व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात बस चालक व वाहक किरकोळ जखमी झाले. हा अपघात मंगळवार (दि.१२) आगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता नगरधन मार्गावरील मोठ्या कालव्याजवळ घडला. माहितीनुसार, रामटेक आगाराची एसटी बस ( एम एच ४० वाय ५३८९) दुधाळा बार्शी जात होती. सिमेंट ट्रक (एम. एच. ४० बीजी ६८२३) नगरधन-काचूरवाही मार्गे तुमसरकडे जात होता. नगरधन- काचूरवाही मार्गावर मोठ्या कालव्याजवळच्या वळणावर अन्नपूर्णा राईस मिल समोर असलेल्या मोठ्या वळणावर एस. टी. बस व ट्रक अमोरासमोर टक्कर होऊन अपघात झाला. झालेल्या अपघातात बस चालक दुर्जन बर्वे, बस वाहक किरकोळ जखमी झाले. अशी माहिती बस चालक दुर्जन बर्वे यांनी दिली. सुदैवाने बसमध्ये एकही प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला असुन कोणतीही जीवित हानी झाली नाही. या परिसरात दोन मोठे वळण आहे. काचूरवाही ते संग्रामपुर रोड व काचूरवाही ते नगरधन रोड वर मोठ्या कालव्याजवळ अन्नपूर्णा राईस मिल जवळ वारंवार अपघात होतात याबाबत बांधकाम विभागाला सूचना करून सुद्धा येथे एकही सूचना फलक लावण्यात आले नाही








