चंद्रपूर १३ : चंद्रपूर शहराच्या मध्यभागी वसलेला, केवळ दगडांनी गोंड राजांनी बांधलेला रमाळा तलाव ही प्राचीन जलव्यवस्थापन तंत्राची एक अद्वितीय खूण आहे. शहरातील पाच तलावांपैकी आता केवळ हाच एक तलाव शिल्लक राहिला आहे. तलावाच्या शुद्धतेसाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. सांडपाण्याचा तलावात प्रवेश थांबवण्यासाठी खास संयंत्र उभारण्यात येत आहे. यासोबतच जलकुंभीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सुमारे दोन कोटी रुपये खर्चून विशेष यंत्रसुद्धा बसवले जाणार आहे. ही यंत्रणा तलावाची नियमित सफाई, जलकुंभीचे निर्मूलन आणि कचरा गोळा करण्याचे काम करेल.
ही संपूर्ण मोहीम गोंडकालीन इमारती, तलाव आणि मंदिरांचे संवर्धन व पर्यावरणपूरक दृष्टिकोन कायम ठेवण्यासाठी राबवली जात आहे.
रमाळा तलावाच्या संवर्धनासाठी महत्त्वाची पावले









