spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत गडचिरोलीत ९ बालकांवर ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया

गडचिरोली :- गडचिरोली, दि. १४ ऑक्टोबर (जिमाका) : सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित विशेष ‘टंग टाय’ शस्त्रक्रिया शिबिरात ९ बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र (DEIC) आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या (RBSK) आश्रमशाळा तपासणी पथकाच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले.

शाळा व आश्रमशाळांमधील आरोग्य तपासणीदरम्यान आढळलेल्या बालकांना संदर्भसेवेद्वारे निदान व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नाक, कान व घसा तज्ज्ञ डॉ. आयुषी गुप्ता यांनी या शस्त्रक्रिया केल्या.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रवी गावंडे यांनी शस्त्रक्रिया कक्षास भेट देऊन पाहणी केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

शिबिरासाठी शस्त्रक्रिया कक्षाचे प्रभारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

Popular Articles