नागपूर :- भारतीय चित्रपटसृष्टीतील अजरामर आणि सदाबहार गीतांना उजाळा देणारी एक भव्य सांगीतिक मैफल ‘बॉलीवूड हिट्स’चे आयोजन स्वरमेघ आर्ट फाउंडेशन आणि स्वप्नगंध यांच्या वतीने करण्यात आले . ही सांगीतिक संध्या शुक्रवार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह, नागपूर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाली. बॉलीवूडच्या सुवर्णकाळापासून आजवर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लोकप्रिय गीतांची सुरेल सफर या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता आली .जुन्या आठवणींना उजाळा देतानाच विविध भावछटांनी नटलेल्या सदाबहार गीतांची मेजवानी रसिकांना दिली. गायक कलाकार स्मिता टोणगावकर, निकेता जोशी, माया सायखेडकर, प्रीती कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, अजय देशपांडे आणि समीर उपाध्ये यांनी आपल्या दमदार आणि सुरेल सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचे संगीत संयोजन परिमल जोशी यांचे होते. वृषाली देशपांडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम आणि साजेसे असे विवेदन केले.या कार्यक्रमाला रसिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी स्वरमेघ आर्ट फाउंडेशन चे अध्यक्ष मनीष उपाध्ये आणि संस्थेचे पदाधिकारी प्रबोध देशपांडे, दिनेश टेकाडे, राजेश दुर्गे, विशाखा पाध्ये, शर्वरी पुराणिक यांचा स्वप्नगंध तर्फे सन्मान करण्यात आला.
“स्वरमेघ आर्ट फाउंडेशन” आणि “स्वप्नगंध” सांगितिक महफिल “बॉलीवूड हिट्स” ९ ऑक्टोबरला उत्साहात संपन्न









