spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारसा – माथणी जि प क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गावातील दुर्गा उत्सव मंडळाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आलेल्या वर्गणीचे मौदा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांकडून वाटप

किशोर साहू, मौदा :- गुरुवार (ता. 15 ऑक्टोबर)ला तारसा -माथनी जि प क्षेत्र अंतर्गत येत असलेले गावे माथनी, धामणगाव, आंजणगाव, ईसापुर, राहाडी, नरसाळा,झुल्लर येथे नवदुर्गा उत्सव मंडळाला महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून आलेल्या वर्गणीचे नवदुर्गा उत्सव मंडळाला भेटी देत भाजपा तालुका पदाधिकाऱ्यांकडून वाटप करण्यात आले. तसेच सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर आलेल्या संकटातून लवकरात लवकर सुटका होऊ दे आणि सर्वांवर मातेची कृपा राहू दे अशी प्रार्थना याप्रसंगी करण्यात आली.

याप्रसंगी नरेश मोटघरे उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा, विनोद मदनकर मौदा भाजपा किसान आघाडी तालुकाध्यक्ष,विरेंद्र पायतोडे भाजयुमो मौदा तालुका कार्याध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष, सचिन मोटघरे तालुका भाजपा नेते ,मंगेश तिघरे भाजपा तालुका महामंत्री,श्याम नारनवरे अनुसूचित जमाती भाजपा तालुकाध्यक्ष,आकाश येळणे भाजयुमो तालुका महामंत्री, सचिन मस्के तालुका भाजपा नेते ,चिंतामण सारवे आजनगाव सरपंच तथा तालुका भाजपा नेते ,शुभम येळणे तसेच तारसा- माथनी या जि प क्षेत्रातील भाजपा व भाजयूमो नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व बुथ प्रमुख होते.

Popular Articles