spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

निलज येथील शेतकऱ्यांच्या वीज समस्येवर शिवसेना (उबाठा) आक्रमक

– अतिरिक्त भारामुळे कृषी पंपांना वीजपुरवठा; नवीन विद्युत डी.पी. बसविण्याची मागणी. 

कन्हान :- पारशिवनी तालुक्यातील निलज येथील बोरी पांदण रस्त्यालगत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेता तील विद्युत पंपांना अपुरा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळा साहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे नवीन विद्युत डी.पी. (रोहित्र) बसविण्याची मागणी केली आहे.

मौजा निलज, ता. पारशिवनी परिसरातील बोरी पांदण रस्त्यालगत असलेल्या शेतांमध्ये महावितरण विभागामार्फत कार्यरत विद्युत डी.पी.वर क्षमतेपेक्षा जास्त भार पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटार पंपांना पुरेसा वीजपुरवठा मिळत नसल्याने अनेकदा कृषी पंप सुरू होत नाहीत. परिणामी शेतातील पिकांना आवश्यकतेनुसार पाणी देता येत नसल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीच्या सिंचनासाठी नियमित आणि योग्य दाबाने वीजपुरवठा होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र विद्यमान विद्युत डी.पी.वरील अतिरिक्त भारामुळे शेत कऱ्यांना शेतीच्या कामात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या गेल्या अनेक वर्षां पासुन कायम असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षा च्या शिष्टमंडळाने महावितरणचे कार्यकारी अभियंता तथा कन्हान येथील निंबाळकर यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. संबंधित ठिकाणी नवीन विद्युत डी.पी. (रोहित्र) बसवुन शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी; अन्यथा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने देण्यात आला. यावेळी माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुका प्रमुख रविंद्र रामचंद्र चकोले यांच्यासह परिसरातील बोरी, सिंगारदीप व निलज येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना वेळेत आणि पुरेशा दाबाने वीजपुरवठा मिळावा, तसेच शेतीच्या सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी महावितरण प्रशासनाने तातडी ने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडुन होत आहे.

Popular Articles