नागपूर :- श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन व भाजपा आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर यांचे द्वारे श्री नवरात्र उत्सवाचे निमित्ताने श्री रेणुका माता मंदिर सी ए रोड येथे महाअष्टमी निमित्ताने श्रीसूक्त पठण व महाआरती भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली व महामंत्री श्रीकांत आगलावे यांचे उपस्थितीत आणि भाविक महिलांच्या उपस्थितीत संपन्न झाली. सर्वप्रथम श्री सद्गुरू सेवातीर्थ फाऊंडेशन च्या मातृशक्तींनी सामूहिक श्रीसूक्ताचे पठण करण्यात आले. त्यांनतर गणपतीची देवीची आणि रेणुकामातेची मंगल सामूहिक महा आरती करण्यात आली. आईचा गजर करून प्रसाद वितरण करून सांगत करण्यात आली. याप्रसंगी नगरसेविका वैशाली उदापुरकर, श्रद्धा पाठक, भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे ,चंद्रशेखर दुबे, कविता भागडकर,ज्योती हराड, दर्शन नखाते, अभिजित कथाले, धनश्री भोरकर, राजश्री गोरे, आणि समस्त पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भाविकवृंद मोठ्या संख्येत सहभागी झाले.








