किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही अरोली येथील चैतन्येश्वर शिवपार्वती मंदिरात घटस्थापना करून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे.शनिवार ( ता. १७ ऑक्टोबर)ला राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या मंदिरात भेट देऊन मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करून अरोलीच्या कोणत्याही विकास कामाला निधीची कमतरता पडू देणार नाही, अरोलीच्या विकास कामात भरघोस निधी देण्यात येईल अशी ग्वाही जयस्वाल यांनी याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांना दिली. 

याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, अरोली सरपंचा रोशनी भुरे, तंटामुक्त अध्यक्ष कैलास समरीत, मंदिर कमिटीचे पदाधिकारी नाना गजबे, सदानंद फटिंग , भाविक महिला, पुरुष मंडळी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








