– चावी अन् मोबाइल आईकडे देऊन घर सोडले; अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांत तक्रार.
कन्हान :- आई सोबत झालेल्या वादानंतर घरातुन निघुन गेलेला ३२ वर्षीय आकाश मिलीन नाडे हा तरुण बेपत्ता झाला आहे. नागपुर ग्रामीण जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाघधरेवाडी येथे ही घटना घडली. याप्रकरणी आकाशची आई शारदा मिलीन नाडे (४६) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार आकाश हा ऑटो चालवि ण्याचे काम करतो. तो आई शारदा नाडे यांच्यासोबत वाघधरे वाडी कन्हान येथे राहत होता. दि.१ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता आकाश ऑटो चालवुन घरी परतला. घरी येण्यास उशीर का झाला ? अशी विचारणा आईने केल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. त्या नंतर दोघांनी जेवण करून झोप घेतली. दुसऱ्या दिव शी (दि.२) ऑक्टोबर ला सकाळी ९ वाजता आकाश झोपेतुन उठला. त्यावेळी आईने पुन्हा उशिरा घरीयेण्या बाबत त्याला समजावले. यावरून नाराजी व्यक्त करत आकाशने ऑटोची चावी आणि मोबाइल आईच्या हातात दिला. ‘मी जातो,’ असे सांगुन तो घराबाहेर पड ला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. शोध घेऊन ही मिळाला नाही. आकाश घरी न परतल्याने कुटुंबी यांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळुन आला नाही. अखेर (दि.३) ऑक्टोबर रोजी आई शारदा नाडे यांनी कन्हान पोलीस ठाण्यात तोंडी तक्रार दिली. अज्ञात व्यक्तीने फूस लावुन मुलाला पळवुन नेल्याचा संशय त्यांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवुन तपास सुरू केला आहे.
बेपत्ता तरुणाचे वर्णन
आकाशची उंची १७० सेंटीमीटर असुन त्याचा बांधा मजबुत आणि रंग गोरा आहे. त्याच्या गळ्यात चांदीचे दोन गोप असुन उजव्या हाताच्या तीन बोटांत चांदीच्या अंगठ्या आहेत. घरातुन निघताना त्याने पांढ ऱ्या-करड्या रंगाची पॅन्ट आणि फिकट पिवळ्या रंगा चा पूर्ण बाह्यांचा शर्ट परिधान केला होता. या प्रकरणा चा तपास कन्हान पोलीस ठाण्याचे हे.कॉ. नरेश दयारा मजी बटबारई करीत आहेत. बेपत्ता आकाश बाबत कोणाला माहिती मिळाल्यास त्यांनी देविदास पेटारे मो. न. ८३२९८९७४४९ यांचेशी किंवा कन्हान पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
१) बेपत्ता तरूण आकाश नाडे चा फोटो.








