भंडारा :- प्रहार संघटना भंडारा तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
शास्त्री चौक, लाल बहादूर शाळेसमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव इंजी.चारुल रामटेके तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील भूलतज्ञ डॉ.सुमित मेश्राम तथा प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.अंकुश वंजारी उपस्थित होते. सायंकाळी ६ वाजता पासून महाप्रसाद वितरणाला सुरुवात झाली.
या महाप्रसादाचा शहरातील व परिसरातील शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रहार विद्यार्थी संघटनेचे शहर अध्यक्ष आदेश मेश्राम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार मेंढे, प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष मनीष काळे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष गुलाब बारई,संघटनेचे सदस्य आकाश नारनवरे, स्वप्नील मेश्राम, जितू मेश्राम,रामेश्वर कांबळे,मनीष लोहबरे, आकाश साठवणे,निहार वासनिक व इतर कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.








