spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ग्रामीण विकास विद्यालय सालवा येथे एस.टी. बससेवा सुरू; विद्यार्थ्यांची प्रवासाची सोय झाली!

– सालवा परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना दिलासा

– महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेचा शुभारंभ

कन्हान :- ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महावि द्यालय, सालवा तसेच श्री साईप्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स, सालवा परिसरातील विद्यार्थी आणि नागरिकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एस.टी. बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बससेवेमुळे परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांची प्रवासाची मोठी सोय झाली असुन पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.

देशाच्या स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्षात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही बससेवा महत्त्वपूर्ण ठरत आहे. सालवा परिसरातील खेडी, खोपडी, बोरी (राणी) , बोरडा (गणेशी), निस्तखेडा, खंडाळा, गांंगनेर, नरसाळा, शिंगोरी, बोरी, सिंगारदीप, निलज आणि खंडाळा (घटाटे) या गावांतील शालेय व महाविद्यालयीन विद्यर्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे. या बससेवेमुळे इयत्ता १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना अहिल्यादेवी होळकर योजने अंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा मिळणार असुन इतर विद्यार्थ्यांनाही अल्प दरात प्रवास करता येणार आहे. तसेच या मार्गावरील इतर प्रवाशां नाही बससेवेचा लाभ घेता येणार असल्याचे एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडुन सांगण्यात आले.

गावकऱ्यांनी केले स्वागत व पूजन

बससेवेच्या शुभारंभ प्रसंगी मार्गावरील विविध गावांमध्ये एस.टी. बसला हार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, गावकरी आणि विद्यार्थ्यांनी बससेवेचे स्वागत केले. ग्रा मीण विकास विद्यालय सालवा येथील शाळेच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमाला श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयवंत काठळकर, संस्थेचे माजी विद्यार्थी गुंडेराव ठाकरे, प्राचार्य मोटघरे तसेच शिक्षक व कर्मचारी बहु संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करून विद्या र्थ्यांसाठी बससेवा सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

 गुंडेराव ठाकरे यांच्या पाठपुराव्याला यश

सालवा व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एस.टी. बससेवा सुरू व्हावी, यासाठी संस्थेचे माजी विद्यार्थी गुंडेराव ठाकरे यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नां मुळे तसेच रामटेक आगार व एस.टी. महामंडळाच्या नागपुर विभागीय कार्यालयाच्या सहकार्यामुळे ही बस सेवा उपलब्ध झाली. बससेवा सुरू करण्यासाठी सह कार्य केल्याबद्दल संस्थेच्या वतीने रामटेक आगार आणि एस.टी. महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अधिक सोयीचे होणार असुन शिक्षणासाठी होणाऱ्या प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे.

सालवा परिसरात एस.टी. बससेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वाता वरण असुन ग्रामीण भागातील शैक्षणिक व दळणवळ णाच्या सुविधांना यामुळे चालना मिळणार आहे.

Popular Articles