spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– न्यू येरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

नागपूर :- सर्वसामान्य जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी पद्धतीने राबविण्यात येईल येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. वर्धमान नगर परिसरात अत्याधुनिक सुविधा असलेल्या मल्टीस्पेशालिटी न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले त्यानंतर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा आमदार कृष्णा खोपडे, चैनसुख संचेती न्यू एरा हॉस्पिटलचे प्रमुख आनंद संचेती, उज्वल पगारिया , डॉ निलेश अग्रवाल हेल्थकेअर इन्व्हेस्टमेंटच्या प्रियंका सावंत , विधिरा मिश्रा आदो यावेळी उपस्थित होते.

नागपूर मेडिकल हब म्हणून ओळखल्या जात असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मेडिकल केअरमध्ये राज्यासह देशात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे मेडिकल टुरिझमला चालना मिळत आहे. भारतातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे विविध देशांमधून आरोग्य सुविधेसाठी प्राधान्य देत आहेत.

राज्यात अत्यंत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासोबतच सर्वसामान्य जनतेला परवडेल अशा पद्धतीने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी 2 हजार 400 आजारांचा जन आरोग्य योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे. न्यू एरा हॉस्पिटलमध्ये अत्यंत दर्जेदार व अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रारंभी दीप प्रज्वलित करून न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले त्यानंतर हॉस्पिटलमध्ये असलेल्या विविध सुविधांची पाहणी केली.

प्रारंभी संचालक डॉक्टर आनंद संचेती यांनी स्वागत करून प्रास्ताविका न्यू एरा रुग्णालयात उपलब्ध सुविधांची माहिती दिली या रुग्णालयात 300 बेड ची सुविधा असून ए आय डिजिटल मेमोग्राफी तात्काळ एमआरआय करण्याची सुविधा यामुळे कर्क रुग्णांना तात्काळ दिलासा मिळणार आहे. या संस्थेतर्फे विविध प्रकल्प राबविण्यात येत असून भविष्यात रुग्णसेवेसाठी विविध प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिले आभार प्रदर्शन निलेश अग्रवाल यांनी केले.

Popular Articles