अमरावती :- आमदार तथा महाराष्ट्र विधानमंडळाच्या विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या राजापेठ येथील मुख्य कार्यालयात भगवान महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयघोषात अभिवादन करण्यात आले.
महर्षी वाल्मिकी यांच्या रामायणातून सत्य, धर्म, त्याग, करुणा आणि मानवतेचा संदेश मिळतो. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजात बंधुभाव व सामाजिक समरसता वृद्धिंगत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जयंतीनिमित्त आमदार रवी राणा आणि भाजपा नेत्या, माजी खासदार नवनीत रवी राणा यांनी आपल्या शुभेच्छा संदेश पत्रद्वारे दिल्या.
यावेळी महर्षी वाल्मिकी जयंती समितीचे उमेश ढोणे, अविनाश काळे, विनोद जायलवाल, नितीन बोरेकर, धीरज गवई, अर्जुन दाते, सुरेश शिरपूरकर, मनोज ढवळे, शोएब खान उर्फ छोटू, साहिल खान, आकाश राजगुरे, स्वर्णाताई शिंदे, सानिका इंगळे, पराग चिमोट, प्रकाश दंदे, एकनाथराव वावरे, मयुर अवझाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.








