– २८ ऑक्टोबरला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) महिला आघाडीची विस्तारित बैठक
हंसराज, भंडारा तुमसर :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दुष्काळग्रस्त भागातील महिलांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता तुमसर येथील हॉटेल गुंज येथे विस्तारित बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी आमदार विद्या चव्हाण, महाराष्ट्र निरीक्षक डॉ. आशा मिरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, पुणे जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय अध्यक्ष कविता मेहेत्रे आणि नागपूरच्या प्रदेश सचिव अंजली साळवे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीत पाणीटंचाई, रोजगाराचा अभाव, आर्थिक अडचणी, उदरनिर्वाह, आरोग्य आणि इतर सामाजिक प्रश्नांवर चर्चा होणार आहे. दुष्काळग्रस्त महिलांना शासकीय मदत मिळावी, यासाठी पुढील भूमिका निश्चित केली जाणार आहे. तसेच महिला संघटनेचे बळकटीकरण आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भंडारा जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष राणी कांतीकुमार ढेंगे यांनी केले आहे.








