spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त धर्मपाल मेश्राम यांच्याकडून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन

नागपूर :- महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त गोकुळपेठ येथील महर्षी वाल्मिकी नगर परिसरात महर्षी वाल्मिकी भगवान यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष तथा प्रिय मित्र सतीश डागोर, ज्येष्ठ सामाजिक नेते उमेश पिंपरे, बंटी पैसाडेली, कपिल नकवाल आणि रोहित बढेल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

महर्षी वाल्मिकी भगवान यांनी आपल्या महान साहित्यकृतीतून समाजाला आदर्श जीवनमूल्ये, नैतिकता आणि मानवतेचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या महान विचारांचा आणि आदर्शांचा समाजात प्रसार करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles