spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तुमसर पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर कारवाई

– मिनी ट्रकसह १० लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त; चालक व मालकावर गुन्हा दाखल

हंसराज,भंडारा तुमसर :- तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हसारा परिसरात मिनी ट्रकमधून अवैध रेती वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी कारवाई केली. या कारवाईत मिनी ट्रकसह एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, चालक व वाहनमालक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मौजा हसारा ते तुमसरच्या दिशेने अशोक लेलँड कंपनीचा मिनी ट्रक (क्र. एमएच ३५ एजे ५६५९) रेती भरून जात असल्याचे आढळून आले. या ट्रकचा चालक प्रतिक संजय कुंभरे (वय २४, रा. सुंदरटोला) याच्याकडे पोलिसांनी रॉयल्टीबाबत विचारणा केली. मात्र, त्याने रेती वाहतुकीचा परवाना सादर न केल्याने, प्राथमिक माहितीनुसार ही वाहतूक अवैध असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी चालकाच्या ताब्यातून एक ब्रास रेती (किंमत ६ हजार रुपये) आणि अशोक लेलँड कंपनीचा मिनी ट्रक (किंमत १० लाख रुपये) असा एकूण १० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई तिलक चौधरी यांच्या लेखी तक्रारीवरून चालक प्रतिक कुंभरे आणि वाहनमालक सचिन मदनलाल येरणे (रा. गोबरवाही) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई) व ४९ अन्वये अपराध क्रमांक १०८०/२०२६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक (ठाणेदार) सुभाष बारसे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब आघाव, सहायक पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार, पोलीस शिपाई तिलक चौधरी, नामदेव बळदे आणि महेंद्र रंगारी यांचा सहभाग होता. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोहर शहारे करीत आहेत.

Popular Articles