किशोर साहू, मौदा :- जि प माध्यमिक , उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय कोदामेंढी येथे गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पदे रिक्त आहेत .
त्याकरिता बुधवार (ता. 28 ऑक्टोबर) ला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नागपूर यांना पवित्र पोर्टल द्वारे समुपदेशनाद्वारे येणाऱ्या नवीन शिक्षकांना जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कोदामेढी येथे इयत्ता पाचवी करिता शिक्षक देण्यासह इतरही वर्गातील व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा कोदामेंढी, पाचगाव, पारडसिंगा येथे संच मान्यता मान्य पदानुसार शिक्षक देण्यात यावे , अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याप्रसंगी भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे, भारतीय जनता युवा मोर्चा तालुका मौदा प्रभारी तथा जिल्हा उपाध्यक्ष वीरेंद्र पायतोडे, उपसरपंच गोपाल गिरमेकर,भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष प्रणय भुतांगे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुधीर गवारकर, सचिव विनोद नाकाडे, कोषाध्यक्ष संदीप गिरडकर उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी यांनी येणाऱ्या समोरील समुपदेशनामध्ये आपल्या शाळेमध्ये शिक्षक मान्य पदांनुसार शिक्षक देण्यात येईल असे आश्वासित केले आहे.








