spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नवीन कामठीत भाड्याच्या खोलीत सट्टापट्टीचा अड्डा!

– पोलिसांची कारवाई; ५० कागदी पन्न्यांसह ८३० रुपये जप्त

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेख डॉक्टर बुनकर कॉलनी परिसरात भाड्याच्या खोलीत सट्टापट्टीची खायवली सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ व ५ अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ५० कागदी पन्ने आणि ८३० रुपये रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.५० ते ४.०४ वाजताच्या दरम्यान शेख डॉक्टर बुनकर कॉलनी येथील मोहम्मद जमिल यांच्या घरी हा प्रकार घडला. घराच्या वरच्या मजल्यावरील बंद खोलीत आर्थिक फायद्यासाठी सट्टापट्टीची खायवली करण्याकरिता जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. पोलिसांना पाहताच खोलीत उपस्थित असलेले काही जण पळून गेल्याचेही नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणात कल्यान खालीद (वय अंदाजे ४५), अनिस तवार (वय अंदाजे २५), मसुद कमाल आणि मोहम्मद जमिल (वय अंदाजे ६०, सर्व रा. शेख डॉक्टर बुनकर कॉलनी, कामठी) यांची नावे नोंदविण्यात आली आहेत.

पोलिसांनी घटनास्थळावरून निळ्या पेनने आकडे व रुपयांच्या नोंदी केलेली, विविध सांकेतिक शीर्षके असलेली एकूण ५० कागदी पाने जप्त केली. याशिवाय ८३० रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ८३० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई नसीम साबीर अंसारी यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २८ ऑक्टोबर रोजी रात्री ९.०५ वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक हनुमान नकाते यांनी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली असून, पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.

Popular Articles