किशोर साहू, मौदा :- जि.प. उच्च प्राथमिक शाळा, धानला येथे सोमवार (ता.२६ ऑक्टोबर)ला झालेल्या धानला केंद्रस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत चुरस पाहायला मिळाली.
या स्पर्धेचा निकाल :
गट १ (इयत्ता ३ ते ५) –
प्रथम क्रमांक – तनीष्का चरडे (जि.प. शाळा पिपरी)
गट २ (इयत्ता ६ ते ८) –
प्रथम क्रमांक – स्वरा विजय हटवार (पीएम श्री जि.प. उच्च प्राथ. शाळा दहेगाव)
दोन्ही विजेत्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत ‘माझा आवाज या उपक्रमातंर्गत…’ विविध गटानुसार वेगवेगळ्या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख राजू आंबीलकर होते.प्रमुख पाहुणे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य धानला नारायण मेश्राम, मुख्याध्यापक वासुदेव भुते पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव , मुख्याध्यापक गजानन बेले जि. प. उच्च प्राथमिक शाळा पिपंरी, मुख्याध्यापक कवडू शेंडे प्राथमिक शाळा सुंदरगाव उपस्थित होते.
संचालन शिक्षिका वनिता दंडारे यांनी केले.
यावेळी सर्व केंद्रातील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धानला केंद्रातील सर्व शिक्षकवृंदाने परिश्रम घेतले.
दोन्ही विद्यार्थिनींचे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी अभिनंदन केले.आभार प्रदर्शन शिक्षिका रंजना बोरकर यांनी केले.








