Home Latest News कामठीत गांजासह एक जण अटक

कामठीत गांजासह एक जण अटक

0
105

 

NDPS कायद्यान्वये कारवाई; 351 ग्रॅम गांजा जप्त
कामठी १४ : जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या पथकाने गुरुवारी रात्री उशिरा वारीसपुरा येथील लाल मदरसा परिसरात कारवाई करून एका व्यक्तीस गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली. त्याच्याकडून 351 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे ₹7,020 एवढी आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी मोहम्मद शाहिद मोहम्मद इजाज (वय 42, रा. लाल मदरसा जवळ, वारीसपुरा, कामठी) हा आपल्या राहत्या घरी विक्रीसाठी गांजा साठवून ठेवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीसांना मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, शासकीय पंच विजय महादेव मस्के व जमील अहमद अन्सारी यांच्या उपस्थितीत आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली.
किचनमधील लोखंडी अलमारीखाली पांढऱ्या प्लास्टिक पिशवीत लपवून ठेवलेला गांजा सदृश्य पदार्थ मिळाला. वजन काट्यावर तपासणी केली असता तो 351 ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. पंचायत समक्ष मुद्देमाल पॅक करून सील करण्यात आला.
आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर NDPS Act 1985 अंतर्गत कलम 8(क), 20(b)(ii)(A) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई डीसीपी निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे ,एन डी पी एस पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आकाश महल्ले,पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मेश्राम, कलिम शेख,अभय मुन, आशिष पवार,अभिमन्यू,दुर्गा आदींनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
@filephoto