spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हर घर तिरंगा रैली चे आयोजन 

 

सचिन चौरसिया,  रामटेक १४ :- तालुका प्रशासनाचे पुढाकाराने व विविध सामाजिक आणि राजकीय संघटनाचे सहभागातून देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्य रामटेक शहरात भव्य तिरंगा रॅली बुधवार (दि.13) काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मल्यार्पण करून बाईक रॅली आंबेडकर चौक, झेंडा चौक करून गांधी चौकात समारोप झाला. खुली जिप्सी मध्ये व बाईक स्वार देशभक्त नागरिकात मोठा उत्साह जाणवत होता. भारत माता की जय, वंदे मातरम आदी नाऱ्यांनी राष्ट्रभक्ती ओसंडून वाहत होती. या वेळी माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मुख्याधिकारी पल्लवी राऊत, तहसीलदार रमेश कोळपे, गटविकास अधिकारी जयसिंग जाधव, अपर तहसीलदार देवलापर पुनम कदम, यांच्या सह उपस्थित राहून देशभक्तीचा जल्लोष साजरा केला. यावेळी कर्मचारी बांधव व आमचे सहकारी मित्र बंधू भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.