spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

– राष्ट्रीय संकल्पदिनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन

नवी दिल्ली :- भारताचे माजी गृहमंत्री दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. निवासी आयुक्त आणि सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी यावेळी पुष्पांजली अर्पण केली.

या प्रसंगी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, प्रमोद कोलपते सहाय्यक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

Popular Articles