spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माजी सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या हस्ते पुसद येथील प्रस्तावित वकील भवनाचे भूमीपूजन

– कोनशिलेचेही केले अनावरण

–  प्रस्तावित वकील भवनाला स्व. वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची केली घोषणा

यवतमाळ :- पुसद येथील जिल्हा सत्र न्यायालय परिसरातील प्रस्तावित वकील भवनाचे भूमीपूजन व कोनशिलेचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश भुषण गवई यांच्या हस्ते शनिवारी दि. ३१ ऑक्टोबर रोजी करण्यात आले.

या समारंभाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर, न्यायमूर्ती वृषाली जोशी, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, न्यायमूर्ती राज वाकोडे, पालकमंत्री ना. संजय राठोड, राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक, प्रधान जिल्हा न्यायाधीश आनंद यावलकर, जिल्हा न्यायाधीश एस जे रामगडिया, नगराध्यक्ष मोहिनी नाईक, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष जयंत जायभाये, उपाध्यक्ष रंजना भोसले, सदस्य ॲड आशिष देशमुख, वकील संघाचे अध्यक्ष ॲड भारत जाधव, वकील संघाचे पदाधिकारी, विधीज्ञ आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भुषण गवई यांनी मनोगत व्यक्त करतांना पोहरादेवी येथील भेटी दरम्यान आलेले अनुभव विषद केले. तसेच संत सेवालाल महाराज्याच्या विचारांची उजळणी केली. यासह पुसदच्या नाईक परिवाराशी असलेले ऋणानुबंध विषद केले. पुसद प्रस्तावित वकील भवनाला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. तसेच निधी उपलब्धतेसाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमात न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी मनोगत व्यक्त करुन पुसदमध्ये कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. तसेच प्रस्तावित वकील भवनाची इमारत ही पायाभूत सुविधा क्षेत्रातील उत्तम उदाहरण राहील, असे प्रतिपादन केले.

देशाचे चारही स्तंभ एका छताखाली हा दुग्धषर्करा योग – पालकमंत्री ना. संजय राठोड

यावेळी पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आजचा हा ऐतिहासिक क्षण आहे. प्रस्तावित वकील भवन हे न्यायव्यवस्थेला बळ देणार केंद्र ठरणार आहे. देशाचे चारही स्तंभ एका छताखाली असून हा दुग्धषर्करा योग असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रस्तावित वकील भवनासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

वकील भवनासाठी निधी कमी पडणार नाही- राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक

सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री ना. इंद्रनिल नाईक म्हणाले की, न्यायव्यवस्थेचा सन्मान राखणे आपली जबाबदारी आहे. प्रस्तावित वकील भवनाच्या कामासाठी निधी कमी पडणार नाही. प्रस्तावित वकील भवनाला माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे असा ठराव झाला असून त्यानुसार नाव देण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केली.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचे स्मृतीचिन्ह देवून स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक ॲड. आशिष देशमुख यांनी प्रस्तावित वकील भवनाची पार्श्वभूमी सांगितले. तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲड भारत जाधव यांनी स्वागतपर मनोगतात पुसदमध्ये कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय आणि औद्योगिक न्यायालय सुरु करण्याची मागणी केली होती.

या कोनशिला समारंभाला पुसद न्यायालयातील विधीज्ञ, अधिकारी व कर्मचारी, नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Popular Articles