spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोधिसत्व बौद्ध विहारात वर्षावास समापन सोहळा उत्साहात संपन्न

– परित्राणपाठ, भोजनदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

कामठी :- आनंद नगर, कामठी येथील बोधिसत्व बौद्ध विहार येथे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी वर्षावास समापन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भंते मिथिला यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वशांतीसाठी परित्राणपाठ घेण्यात आला. तसेच यानिमित्ताने भोजनदान व वृक्षारोपण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कामठी नगराध्यक्ष अजय अग्रवाल, नगरसेवक नीरज यादव व आकाश भोखरे यांची उपस्थिती होती.

यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे सदस्य तसेच ‘पेड़ लगाओ, पानी बचाओ’ अभियानाचे विलास संतापे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

वर्षावास समापन सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचे रक्षण आणि वृक्षांचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला. भगवान गौतम बुद्धांच्या करुणा, मैत्री, शांती आणि सर्व जीवांप्रती प्रेम या विचारांसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संकल्पही यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विहार कमिटीचे विदेश डोंगरे, अल्पेश भोवते, शैलेश रामटेके, संदेश डोंगरे, प्रिन्स खोब्रागडे, आशीष रामटेके, प्रणय गजभिये, गंगा नागदेवे, राजश्री डोंगरे, संगीता मेश्राम, सुगंधा लांजेवार, हर्षाली साखरे, संघा गडपायले, आरती वाघमारे व मीनाक्षी खोब्रागडे, साहित्री लेंडारे यांनी अथक परिश्रम घेतले.

सर्वांच्या सामूहिक सहकार्यामुळे वर्षावास समापन सोहळा उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.

Popular Articles