spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी, एकूण १९ पुरस्कार जिंकून विद्यापीठ स्तरासाठी निवड

कामठी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे अंत्योदय महाविद्यालय, देवग्राम येथे आयोजित ‘आविष्कार २०२६’ या संशोधन आणि प्रकल्प स्पर्धेच्या जिल्हास्तरीय फेरीत श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी (SKBCOP), कामठीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट संशोधन दृष्टी आणि नाविन्यपूर्णतेच्या जोरावर एकूण १९ पुरस्कार पटकावले आहेत.

महाविद्यालयाच्या या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या दर्जेदार संशोधन प्रकल्पांच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर आपले कर्तृत्व दाखवले असून, आता ते विद्यापीठ स्तरावर आपल्या या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे (Innovations) प्रतिनिधित्व करतील.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली व संशोधन आणि मान्यता विभागाचे अधिष्ठाता डॉ. ब्रिजेश ताकसांडे तसेच स्पर्धा समन्वयक डॉ. संदीप रहांगडाले व सर्व मार्गदर्शकांच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विद्याशाखांमध्ये यश संपादन केले आहे, ज्यामध्ये अंडरग्रॅजुएट (UG) स्तरावर कॉमर्स अँड मॅनेजमेंटमध्ये रजत, ऋषभ, रितू, अंजली, संस्कृति व अंश (प्रथम); प्युअर सायन्समध्ये रिद्धी व प्राची (तृतीय); मेडिसिन अँड फार्मसीमध्ये मैथिली, मन्दार व पलक (द्वितीय); आणि इंजिनिअरिंगमध्ये अदनान कुरेशी, हर्षल बयास्कर, चिरायु गजभिए, दत्तराज देशपांडे, ईशा कटरे व मयंक तापडिया (चतुर्थ) यांनी यश मिळवले. तसेच पोस्टग्रॅजुएट (PG) स्तरावर मानव्यशास्त्रामध्ये जयदीप वानखेडे (द्वितीय); इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती भोयर (प्रथम) व जाह्नवी शहाने (द्वितीय); कृषी क्षेत्रामध्ये अक्षय ताले (द्वितीय); प्युअर सायन्समध्ये अरुबा खान (तृतीय); आणि मेडिसिन अँड फार्मसीमध्ये सागर करगांवकर (प्रथम), गौरी साल्बर्डे (द्वितीय), साक्षी जरवेकर (तृतीय), रचना गौत्रे (चौथा), गौरव बावने (चौथा), स्नेहल पटेल (पाचवा) व अपूर्वा गुराव (सहावा) हे विजेते ठरले. याशिवाय, पोस्ट-पोस्टग्रॅजुएट (PPG) स्तरावरील मेडिसिन अँड फार्मसी विभागात सुअंकित हरणे प्रथम, तन्वी प्रेमचंदानी द्वितीय आणि मोहम्मद कुतुब यांनी तृतीय स्थान पटकावले.

या यशाबद्दल महाविद्यालय व्यवस्थापन आणि प्राध्यापकांनी सर्व विजेत्यांचे, प्राचार्य डॉ. मिलिंद उमेकर यांचे तसेच सर्व मार्गदर्शकांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Popular Articles