ब्राह्मणवाडा थडी (अमरावती): चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी येथील पूर्णा नदीच्या अस्थायी बांधण्यात आलेल्या व पुराने तुटलेल्या पुलाजवळ आंघोळीस गेलेल्या संकेत संतोष भुसारे (११, रा. अंधरवाडी ह.मु. वार्ड नं.४, ब्राम्हणवाडा थडी) या मुलाचा पुलाजवळच्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. पूल तुटलेल्या अवस्थेत असल्याने बाहेर आलेल्या लोखंडी सळाखांमध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता न आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रविवारी दुपारी ४ च्या सुमारास बुडालेल्या संकेतचा मृतदेह रात्री ७ च्या सुमारास काढण्यात आला. ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी आकास्मिक मृत्युची नोंद केली.








