नागपूर :- संभाजी ब्रिगेड नागपूर महानगराच्या पुढाकाराने मराठा सेवा संघ व सहयोगी संघटनांच्या संयुक्त सहभागातून शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी मराठा सेवा संघ लॉन, त्रिमूर्ती नगर, नागपूर येथे कोजागिरी उत्सवाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी आणि नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाला शिवश्री मधुकर मेहकरे, शिवश्री रमेश बोरकुटे, शिवश्री सोमनाथ लाडके, शिवश्री राजीव जगताप, शिवश्री दिलीप खोडके, शिवश्री प्रमोद वैद्य, शिवश्री प्रताप पटले, शिवश्री बालनाथ मानकर, शिवमती स्वाती शेंडे, शिवमती जया देशमुख, शिवमती सीमा टालाटुले , शिवमती स्मितल राऊत, शिवमती मनीषा चौधरी, शिवमती अनिता ठेंगरे आणि शिवमती संजीवनी सोमवंती यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच विविध कक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात संगीतसूर्य सांस्कृतिक कक्षाच्या वतीने सुगम संगीताचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक खेळांमुळे कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी संगीत, मनोरंजन आणि सामूहिक सहभागाचा मनमुराद आनंद घेतला. या कोजागिरी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा, बंधुभाव, आपुलकी आणि संघटनात्मक एकजूट अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दैनंदिन कामकाजातून वेळ काढून सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कुटुंबीयांना एकत्र येण्याची संधी या कार्यक्रमामुळे उपलब्ध झाली. सामाजिक कार्यासोबतच सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे, परस्परांमधील स्नेह वाढविणे आणि संघटनात्मक नातेसंबंध अधिक दृढ करणे, हा या उत्सवामागील प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संभाजी ब्रिगेड नागपूर महानगराच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संगीतसूर्य सांस्कृतिक कक्ष आणि संबंधित सहयोगी घटकांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांचे आणि सहकार्य करणाऱ्यांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.








