– अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना यश
मुंबई :- अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या अथक प्रयत्नांमुळे नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) मधील कर्मचाऱ्यांना 57 हजार रुपये तर ‘एजिल’मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 18 हजार रुपये बोनस मंजूर झाला आहे. त्यामुळे कर्मचारीवर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी अखिल भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

‘एजिल’मधील 2,815 कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. हे दोन्ही यश म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याला सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देण्याच्या संघटनेच्या कटीबद्धतेचे हे प्रतिक असून कामगारांच्या हक्कांसाठी, न्यायासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी संघटना सदैव संघर्षशील राहील, असे रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले.








