– कन्हान पोलिसांची कारवाई; एक आरोपी अटकेत, १ लाख ८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
कन्हान :- हर्ष ए. पोद्दार, वरिष्ठ पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा, अनिल म्हस्के, अपर पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण जिल्हा आणि शशांत एन.एम. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी, कन्हान उपविभाग यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे, प्रभारी अधिकारी, पोलीस स्टेशन कन्हान यांच्या नेतृत्वात अंमली पदार्थविरोधी मोहिमेंतर्गत कन्हान पोलीस यांनी कारवाई करत Dicyclomine HCI Tramadol या (Psychotropic) औषधयुक्त गुंगीकारक कॅप्सूलचा अवैधरित्या विनापरवाना साठा करून त्यांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण १,०८,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक ०३/११/२०२६ रोजी कन्हान पोलीस हे अवैध धंदयावर कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराने माहीती दिली की, राजेंद्र नामदेवराव हटवार, वय ५८ वर्ष, रा. रामनगर (गणेशनगर) तिवाडे ले आऊट, कन्हान, ता. पारशिवनी, जि. नागपूर हा राजेंद्र मेडीकल, आंबेडकर चौक कन्हान येथे व आपल्या राहत्या घरी रामनगर (गणेशनगर) कन्हान येथे विनापरवाना Pyeevon Spas Plus या ब्रँडच्या Dicyclomine HCI, Tramadol असलेल्या गुंगीकारक कॅप्सूलचा साठा करून त्यांची ग्राहकांना विक्री करीत आहे. कन्हान पोलीसांनी सदर वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सापळा रचुन कारवाई करत औषध निरीक्षक यांच्यासह आरोपी राजेंद्र नामदेवराव हटवारच्या राहत्या घरी छापा टाकला. सदर घर झडतीदरम्यान ३७ बॉक्स मध्ये Dicyclomine HCI, Tramadol असलेल्या Pyeevon Spas Plus एकूण ८८८० कॅप्सूल (एकूण वजन ४४४० ग्रॅम किंमत ८८,८००/- रुपये, ०१ अॅडरॉईड मोबाईल किंमती २०,०००/- रूपये, असा एकूण १,०८,८००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध कन्हान पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायदयाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. साखळी पुरावे जोडुन नागपुर ग्रामीण पोलीस सदर गुन्हयाचा तपास करीत आहेत.








