Related Posts

फळबागा जगविण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> राज्यात फळबागा असलेल्या एकूण 6 लाख 85 हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे 2&period;5 लाख हेक्टर क्षेत्र आहे&period; या भागातील तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फळबागा जगविण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक असून या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल&comma; असे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>विधानसभा सदस्य सुरेश धस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये बाधित होणाऱ्या फळबागा जगविण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मदत उपलब्ध करून देण्याची विनंती मंत्री गोगावले यांच्याकडे केली&period; या अनुषंगाने मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंत्री गोगावले यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात असलेल्या तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील शेतकरी बाधित झाला आहे&period; विविध पिकांसोबतच या भागातील फळबागा लागवडीवरील क्षेत्र सुमारे 2&period;5 लाख हेक्टर एवढे असून पाणी पुरवठ्याअभावी उभी असलेली फळबाग नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे&period; यामुळे या भागातील फळबागांना पाणीपुरवठा करणे अथवा त्यासाठी शेतकऱ्यांना व्हीबी जीरामजी योजनेच्या माध्यमातून मदत करणे&comma; अशा उपायोजना करणे गरजेचे आहे&period; याबाबत मंत्री गोगावले यांच्याशी बैठकीत चर्चा करण्यात आली&period; केंद्र सरकारकडून व्हीबी जीरामजी योजनेअंतर्गत 375 कामांकरिता राज्यासाठी 4420 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे&period; त्या निधीबरोबरच फळबाग बाधित होण्याची शक्यता असलेल्या क्षेत्राकरिता एक वेळची विशेष बाब म्हणून केंद्र सरकारने मदत करावी&comma; असा प्रस्ताव पाठविण्यात येईल&comma; असे मंत्री गोगावले यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>या बैठकीत रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे&comma; सहसचिव कैलास साळुंके&comma; फलोत्पादन विभागाचे उपसचिव श्रीकांत आंडगे&comma; फलोत्पादन संचालक जीवन बुंदे&comma; व्हीबी जीरामजी योजनेच्या आयुक्त अनिता मेश्राम &lpar;दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे&rpar; आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;