तिरोडा १६ :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने शंभर दिवस दिवसाची कार्यालय सुधारणा बाबत विशेष मोहीम राबवण्यात आली होती. ज्यामध्ये तीन विभागीय स्तरांवर ही विशेष मोहीम राबवण्यात आली. यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका स्तरावर राबविण्यात आली होती. या मोहिमेमध्ये 12, 500 शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता. या मोहिमे अंतर्गत नागपूर विभागातून उपजिल्हा रुग्णालय गटातून उप जिल्हा रुग्णालय तिरोडा कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. गोंदिया येथील पोलिस मुख्यालयात शासकीय ध्वजारोहण सोहळा कार्यक्रम पार पडला ज्यामध्ये राज्याचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिरोडा उपजिल्हा रुग्णालयाने प्रथम क्रमांक पटकाविल्याने उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ राहुल शेंडे यांनी प्रशस्तीपत्र स्विकारले .यावेळी डॉ. संजय भगत डॉ अविनाश शेंडे, डॉ.आशीष बनसोड, संगीता बन्सोड परिसेविका कुंदा हरीणखेडे, परिसेविका, धनीका नंदेश्वर परिसेवीका ,कमलेश शुक्ला ,अनमोल लोखंडे, उपस्थित होते.तर शरद देशमुख औषध निर्माण अधिकारी, यांचे विशेष योगदान लाभले असल्याचे सांगण्यात येत आहे.




