– ईडा पिडा टळू दे ! बळीराजाचं राज्य येऊ दे !!
कन्हान :- “माझी प्रजा, अनदाता सुखी भवः” म्हणुन सर्वांचा प्रजाहितदक्ष, महासम्राट बळीराजांचा महोत्स व मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शांताराम जळते यांचे घर परिसरात महासम्राट बळीराजा व महापुरूषांना अभिवादन करून येणा-या पिढीला आपले पुर्वज,महा नायकांचा इतिहास आत्मसात व्हावा या उध्दात हेतुने महासम्राट बळीराजा महोत्सव थाटात साजरा करण्या त आला.
ईडा पिडा टळू दे ! बळीराजाचं राज्य येऊ दे !!
सुमारे ३५०० वर्षापासुन समस्त भारतीय ज्यांच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करीत आहेत, असा सिंधु, कृषीचा महानायक, कुलस्वामी, समतावादी, प्रजाहित दक्ष, स्वामी तिन्ही जगाचा, महादानशूर, महाबली म्हणु न सतत विचार, जीवलग की सात कालजाच्या आत जपुन ठेवावा अश्या महासम्राट बळीराजांचा महोत्सव महाराष्ट्रात थाटात साजरा करण्यात येत असुन मराठा सेवा संघ कन्हान व्दारे शांताराम जळते यांच्या प्रांगणात मराठा सेवा संघ उपाध्यक्ष ताराचंद निंबाळकर यांचे अध्यक्षेत तसेच प्रमुख अतिथी जागृत जेष्ट नागरिक संघाचे अध्यक्ष बब्रुवान घोडमारे, कन्हान नगराध्यक्ष राजेंद्र शेंदरे, माजी सैनिक जयवंत गडपायले, जिजाऊ ब्रिगेड कन्हान अध्यक्षा माया इंगोले आदी मान्यवरांच्या हस्ते महासम्राट बळीराजा, महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून जिजाऊ वंदना घेऊन बळीराजांचा जयघोष करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांना बळी राजाची प्रतिमा व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी बब्रुवान घोडमारे, राजेंद्र शेंदरे, संजय करंडे, प्रशांत मसार, माया इंगोले आदींनी ३५०० वर्षा पासुन समस्त भारतीय दिवाळीच्या पाडव्याला ज्यांच्या पुनरागमनाची प्रतिक्षा करीत आहे. अश्या महासम्राट बळीराजांच्या जिवनावर प्रकाश टाकीत उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक शांताराम जळते यांनी तर मोतीराम रहाटे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यकत केले. यावेळी माजी सैनिक प्रविण सतदेवे, अरविंद अंबास्कर, जागृती जेष्ट नागरिक संघ कन्हान सचिव संजय करंडे, प्रभाकर रुंघे, दिलीप बागडी, कन्हान विकास मंच अध्यक्ष वृषभ बावनकर, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार , नगरसेवक विनोद किरपान, राजेंद्र गाडगे, साहेबलाल बघेले, राजु गुरधे आदी सह मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता मराठा सेवा संघ कन्हान चे शांताराम जळते, मोतीराम रहाटे, वसंतराव इंगोले, योगराज अवसरे, दिपक उघडे, बबनराव इंगोले , भगवान कडु, दिगांबर हारगुडे, संजय चंहादे, अक्षय जळते, जिजाऊ ब्रिगेड कन्हानच्या लता जळते, रंजना इंगोले, निकिता जळते आदींनी सहकार्य केले.






