spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी श्रीमंत संतोष सुरपाम यांची नियुक्ती!

– प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सन्मान

गडचिरोली :- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या संघटनात्मक विस्ताराला बळकटी देण्याच्या दृष्टीने श्रीमंत संतोष सुरपाम यांची अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनुसूचित जमाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील विविध प्रश्न, समस्या आणि प्रलंबित मागण्या शासनदरबारी तसेच संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडणे, समाजातील नागरिकांना संघटनेशी जोडणे, पक्षाची ध्येयधोरणे आणि विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे, तसेच संघटनात्मक कार्य अधिक व्यापक व मजबूत करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी प्रदेश सदस्य म्हणून श्रीमंत संतोष सुरपाम यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

गडचिरोली जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथे अनुसूचित जमाती समाजाच्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि विकासात्मक प्रश्नांना विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत प्रदेश स्तरावर काम करण्याची संधी मिळाल्याने समाजाच्या प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. समाजातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या योग्य व्यासपीठावर मांडणे, शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविणे आणि संघटनेच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविणे, या कामांवर त्यांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.

नियुक्तीपत्र प्रदान करताना भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी श्रीमंत संतोष सुरपाम यांना पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाने व संघटनेने सोपविलेली जबाबदारी निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पाडावी. समाजाच्या हितासाठी सातत्याने कार्यरत राहून पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश बारसागडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. नितीन कोडवते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आमदार कृष्णा गजबे, भाजपा महामंत्री प्रकाश गेडाम, डॉ. चंदा कोडवते याचे आभार व्यक्त केले

या नियुक्तीमुळे श्रीमंत संतोष सुरपाम यांच्यावर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या प्रदेश सदस्यपदी झालेल्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत असून, आगामी काळात अनुसूचित जमाती समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि पक्षसंघटनेच्या विस्तारासाठी ते सक्रिय भूमिका बजावतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Popular Articles