spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोहपा–कळमेश्वर रोडवर चारचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; अपघातानंतर वाहनचालक फरार!

– वेळ 8 pm ठिकाण : सावंगी बसस्टॉपजवळ, मोहपा–कळमेश्वर रोड

मोहपा :- कळमेश्वर मार्गावरील सावंगी बसस्टॉपजवळ गुरुवारी एका भीषण अपघाताची घटना घडली. श्रावण आनंदराव साबळे (वय ६४ वर्षे, रा. वडोना खुर्द) हे रस्त्याने पायी जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात श्रावण साबळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, कळमेश्वर येथे दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर संबंधित चारचाकी वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या घटनेचा पुढील तपास मोहपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कोमल खैरे व पोलीस हिमांशू वंजारी करीत आहेत. फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

रस्ते अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जात असून, वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आणि अपघातानंतर जखमींना मदत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Popular Articles