spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

अवैध रेती वाहतुकीवर गुन्हा दाखल

देवलापार :- देवलापार पोलीस अवैध धंदयांवर कारवाई कामी पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना गुप्त बातमीदारांकडुन खात्रीशीर माहीती मिळाली की, ट्रॅक्टरने अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी ट्रॅक्टर शोध कामी सर्तक पेट्रोलींग केली असता मौजा खनोरा शिवार येथे एक ट्रॅक्टर क्र एम एच ४० एल २०४३ विना कमांकाच्या ट्रॉलीसह संशयीतरित्या जाताना दिसुन आले. सदर ट्रॅक्टर थांबवुन चालकास त्याचे नाव पत्ता विचारले असता आरोपी वाहन चालक क्र. १) तिलकचंद गंगाराम कोवाचे, ३० वर्ष, रा. हिवराबाजार ता. रामटेक अशी माहीती समजली. पोलीसांनी आरोपीच्या वाहनाची तपासणी केली रेती आढळुन आली. पोलीसांनी त्याला अधिक विचारपुस केली असता त्याने आरोपी क्र. २) वाहन मालक नामे फुलचंद दौलत बमनोटे, वय ६८ वर्ष, रा. हिवराबाजार, ता. रामटेक याच्या सांगण्यावरून खानोरा नाल्याच्या पात्रातुन अवैधरित्या उत्खनन करून रेतीची चोरटी वाहतुक केल्याचे सांगितले.

पोलीसांनी पंचासमक्ष ट्रॅक्टर ट्रॉली आणि १ ब्रास रेती असा एकुण किंमती ७,५५,००० /- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. नमुद आरोपी यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ४९ भान्यासं सह कलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम चे कलम ४८ (७) (८), खाण व खनिज (विकास व विनियमन) अधिनियम चे कलम ४/२१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles