spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

– १.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त

केळवद :- केळवद पोलीसांना गुप्तबामीदारा द्वारे खात्रीशीर माहीती मिळाली की, मौजा नांदागोमुख वार्ड क ०४ येथे सार्वजनिक ठिकाणी काही इसम ५२ ताशपत्तयांचा जुगार खेळत आहे. पोलीसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी धाड टाकली असता काही इसम जागीच जुगार खेळतांना मिळुन आले.

पोलीसांनी पंचाासमक्ष आरोपीतांच्या ताब्यातुन ५२ ताशपत्ते, एकुण रोख रक्कम १०००/- रुपये, १ अॅड्रॉईड मोबाईल, १ अॅपल मोबाईल आणि इतर साहीत्य असा एकुण १,३४,०००/- रूपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. नमुद प्रकरणी आरोपी नामे १) आवेश परसराम बिजोरे, वय २७ वर्ष, २) रूषभ प्रमोद गोंडुळे, वय २१ वर्ष, दोन्ही रा. वार्ड क ०४, नांदागोमुख, ता सावनेर ३) नारू उर्फ नरेंन्द्र, गजभिये, रा. वडचिचोली, ता. जि. पांढुर्णा यांच्या विरुद्ध कलम १२ (अ) म. जू.का. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Popular Articles