spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- भारताच्या माजी पंतप्रधान भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित छोटेखानी समारंभात उपमहापौर लिला हाथीबेड यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, , उपायुक्त निर्भय जैन, मंगेश खवले, डॉ. मेघना वासनकर, मुख्य अग्नीशमन अधिकारी राजेंद्र उचके सहायक आयुक्त श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, प्रमोद हिवसे, प्रमोद बाराई यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रीय एकात्मता दिनाच्या औचित्याने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. तत्पूर्वी शांतीनगर स्थित इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले.

तसेच उपमहापौर लिला हाथीबेड यांच्या हस्ते राजे श्रीमंत रघुजीराव भोंसले यांच्या जयंती निमित्त सक्करदरा चौक स्थित पुतळ्याला आणि वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त झाशी राणी चौक स्थित अश्वारूढ पुतळ्याला विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनय दाणी, मनपाचे जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, शैलेश जांभूळकर यांच्यासह अग्निशमन जवान उपस्थित होते.

Popular Articles