spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आसमान महिला क्रेडिट सोसायटीतर्फे दिवाळी उत्साहात साजरी

– श्री महालक्ष्मी पूजनासह ग्राहकांना विविध ठेव व कर्ज योजनांची माहिती; आकर्षक व्याजदरांच्या योजनांना प्राधान्य

नागपूर :- आसमान महिला क्रेडिट सोसायटी तथा आसमान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. दिवाळीनिमित्त पंचमीच्या शुभमुहूर्तावर संस्थे च्यावतीने श्री महालक्ष्मी पूजनाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या पूजन सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, संचालक मंडळ, ग्राहक आणि आसमान फाउंडेशनचे मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मंगलमय प्रसंगी सोसायटीचे ग्राहक दिनेश टेकाडे व दीपिका टेकाडे यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी पूजन करण्यात आले. पंडित सुयोग जोशी गुरुजी यांच्या विधिवत पौरोहित्यात पूजेचा कार्यक्रम भक्तिभावाने संपन्न झाला. यावेळी उपस्थितांनी सुख, समृद्धी आणि भरभराटीसाठी श्री महालक्ष्मीचे पूजन करून प्रार्थना केली. कार्यक्रमादरम्यान सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. रवि गिऱ्हे यांनी उपस्थित ग्राहकांशी संवाद साधत संस्थेच्या विविध आर्थिक योजना, ठेव योजना आणि कर्ज सुविधांची सविस्तर माहिती दिली. सामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबरोबरच गरजू व्यक्तींना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. सोसायटीच्या माध्यमातून गरजू नागरिकांना नवीन दागिने खरेदी करण्यासाठी वार्षिक १० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय १३ महिन्यांच्या विशेष मुदत ठेवीवर (एफडीआर) ९ टक्के व्याजदर, तर ‘बचपन आवर्ती ठेव योजने’अंतर्गत एक वर्षासाठी ९.५ टक्के व्याजदर देण्यात येत आहे. या आकर्षक योजनांसोबतच संस्थेमार्फत ग्राहकांसाठी इतर विविध ठेव व कर्ज योजनाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ग्राहकांनी संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक बचतीला प्राधान्य द्यावे, असे आवाहनही डॉ. रवि गिऱ्हे यांनी केले. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यामुळे ग्राहक आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये स्नेहपूर्ण वातावरण निर्माण झाले. धार्मिक परंपरेसोबतच ग्राहकांना आर्थिक योजनांची माहिती देण्याचा उपक्रमही या कार्यक्रमातून साध्य झाला. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष मेघा गिर्हे, उपाध्यक्ष विभा विंचूरकर, प्रकाश गोरले, वंदना गोरले, अनिल देव, मधुरा कोलारकर, व्यवस्थापक पायल काळे, निहारिका विंचूरकर, संचालक मंडळाचे सदस्य, सोसायटीचे ग्राहक तसेच आसमान फाउंडेशनचे पदाधिकारी व मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Popular Articles