spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कीर्तनकाराचा थेट धक्का : बाळासाहेब थोरातांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेस आक्रमक – राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही?

अहिल्यानगर १९ : संग्राम भंडारे नावाच्या कीर्तनकाराने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. “थोरात समाजातील विघातक प्रवृत्तींचा विरोध करतात, त्यामुळे त्यांना नथुराम गोडसे व्हावे लागेल अशी धमकी दिली जाते, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अध:पतनाचे लक्षण आहे,” असे ते म्हणाले.

संगमनेरजवळील घुलेवाडी गावातील कीर्तनावेळी भंडारे यांनी कथित राजकीय भाष्य केल्यामुळे गोंधळ उडाला. यानंतर व्हिडिओद्वारे त्यांनी थोरात यांना धमकी दिली. काँग्रेसने हा व्हिडिओ प्रसिद्ध करून संताप व्यक्त केला. “राज्यात पोलिसांचा धाक आहे की नाही?” असा थेट सवाल वडेट्टीवारांनी गृहमंत्र्यांना केला.

दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांनीही भंडारे यांच्यावर पलटवार करत “संतांच्या परंपरेला काळिमा फासणारी भाषा वारकरी संप्रदाय सहन करणार नाही” असे म्हटले. त्यांनी थोरात कुटुंबाने संगमनेरच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी केलेले योगदान अधोरेखित करत, भंडारे यांची वक्तव्ये ही फक्त राजकीय नाहीत तर संगमनेरचे नाव बदनाम करणारी असल्याचा आरोप केला.

या प्रकरणामुळे अहिल्यानगर व संगमनेरचे राजकारण तापले असून, स्वतः बाळासाहेब थोरात पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.

Popular Articles