spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना

नागपूर, दि. २० : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत वर्ग अकरावीच्या पुढे शिक्षण घेणा-या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परिक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, नागपूरमार्फत राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्ती योजना ही सन २०१८-१९ या वित्तीय वर्षापासून ऑनलाईन करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन महाडीबीटी प्रणाली https://mahadbtmahait.gov.in मार्फत राबविण्यासाठी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ऑनलाईन महाडिबीटी प्रणाली करिता https://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर २०२५-२६ साठी नागपूर जिल्हयातील उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयातील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचे फॉर्म दिव्यांग विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर भरण्याची कार्यवाही करावी.  अधिक माहितीसाठी  कार्यालयीन वेळेत जिल्हा परिषद येथे जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण विभाग, नागपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिकारी अजय अहिवळे यांनी केले आहे.

Popular Articles