spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नेर येथे अंगणवाडी सेविकांसाठी ग्रामबाल संरक्षण कार्यशाळा

 

यवतमाळ, दि. २१  :  महिला व बाल विकास विभाग, महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य बाल संरक्षण संस्था, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नेरच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती नेर येथे एक दिवसीय तालुकास्तरीय ग्रामबाल संरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळेस गटशिक्षण अधिकारी धर्माळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी, घोडे, संरक्षण अधिकारी अभय केंद्रे, शांतीकुमार राठोड, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या. कार्यशाळा यवतमाळ, कळंब येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अविनाश पिसुर्डे यांनी ग्राम बाल संरक्षण समितीची रचना, त्यांच्या भूमिका व जबाबदारी, बालकांचे अधिकार, गाव पातळीवरील बाल संरक्षणाचे प्रश्न तसेच जिल्हास्तरीय यंत्रणेची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केली. पुनम कन्नाके यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 व बाल संगोपन योजना आणि गृहचौकशी अहवाल कसे भरावे याबाबत माहिती दिली.

अंगणवाडी सेविका  पवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. प्रास्ताविक विधी तथा परीविक्षा अधिकारी, महेश हळदे यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी  देवेंद्र राजूरकर व ढाले यांनी  मोलाचे सहकार्य केले. कार्यशाळेची सांगता संरक्षण अधिकारी शांतीकुमार राठोड यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. बाल विकास प्रकल्प अधिकारी व ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट यांच्या संस्थेच्या सहयोगाने कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. तालुक्यातील 110 अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.

Popular Articles