spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भारतीय सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी प्रशिक्षणाची संधी

यवतमाळ, दि. २१ : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेकशन बोर्ड, एसएसबी या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे इच्छुक असलेल्या नवयुवक आणि नवयुवतींसाठी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

प्रशिक्षण केंद्र येथे दिनांक २२ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एसएसबी कोर्स क्रमांक ६२ आयोजित करण्यात आला आहे. कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास,भोजन, प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारीपदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यवतमाळ येथे दि.११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता मुलाखतीस हजर रहावे.

मुलाखतीस येतेवेळी उमेदवाराने डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेरे पुणे डीएसडब्ल्यू यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील एसएसबी ६२ कोर्ससाठी किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे. किंवा व्हाट्सॲप क्रमांक 9156073306 या मोबाईल नंबरवर एसएसबी ६२ हा मेसेज केल्यास कोर्ससाठी संबंधित परिशिष्ट उपलब्ध करुन दिले जाईल. शिफारस पत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

केंद्रामध्ये एसएसबी कोर्स मध्ये प्रवेश मिळण्यासाठी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येतांना सोबत घेवून येणे आवश्यक आहे. कंम्बाईड डिफेंस सर्विसेस एक्झामिनेशन सीडीएसए-युपीएससी अथवा नॅशनल डिफेंस ॲकेडमी एक्झामिनेशनए एनडीए- युपीएससी पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वाटरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.

टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी :training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्रमांक ०२५३-२४५१०३२ किंवा व्हाटसअप क्रमांक 9156073306 वर प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

@filephoto

Popular Articles