सचिन चौरसिया, रामटेक २१ :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आव्हानानुसार (दि. १२ ते १८) ऑगस्ट दरम्यान अँटी रॅगिंग आठवडा व अँटी रॅगिंग सेलच्या माध्यमातून विद्यासागर कला महाविद्यालय खैरी (बिजेवाडा) येथे उद्धाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रा. रवींद्र पानतावणे होते. तर डॉ. ज्योती कवठे, डॉ. सतीश महल्ले यांनी मार्गदर्शन केले. अँटी-रॅगिंगच्या संदर्भात उद्बोधन करून रॅगिंगच्या संदर्भात विद्यार्थ्यांना जागृत करण्याचे कार्य या मार्गदर्शनातून करण्यात आले. डॉ. ज्योती कवठे यांनी रॅगिंगचे दुष्परिणाम किती भयावह असतात, याचे अनेक उदाहरणांच्या माध्यमातून समजून सांगितले. त्याचबरोबर डॉ. सतीश महल्ले यांनी रॅगिंग हा प्रकार विद्यार्थी जीवनाला कसा उद्ध्वस्त करून टाकतो याचे वर्णन अनेक उदाहरणांच्या माध्यमातून केले. याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून रवींद्र पानतावणे यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयातील अँटी रॅगिंग सेलचे समन्वयक डॉ. गिरीश सपाटे यांनी केले. आभार प्रा .गंगा मोंढे यांनी मानले. याप्रसंगी डॉ. आशिष ठाणेकर विचारमंचावर उपस्थित होते. अँटी रॅगिंग सेलच्या माध्यमातून महाविद्यालयात आठवडाभर अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात घोषवाक्य लेखन, निबंध लेखन, पोस्टर बनवणे, प्रश्नमंजुषा, वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पोस्टर स्पर्धेत जिया कैलाश हिरोंदी, कनिष्का चरडे, मनिषा भुतकर, प्रिया मोहनकर, महेक कोकण, प्रिया गवळीवार, तृप्ती पिसोडे, मनिषा भटकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर निबंध स्पर्धेत प्रणाली चंदनबटवे, तृप्ती पिसोडे, जिया हिरोंदी, योगिनी शरणागत, महेक कोकण, मनिषा भटकर इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला



