मुंबई २१ : वसई-विरार महानगरपालिकेत महाघोटाळ्याचा पर्दाफाश! अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) चौकशीत तब्बल ₹275 कोटींच्या लाचखोरीचा मोठा खुलासा झाला आहे. माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर गंभीर आरोप बांधकाम परवानग्यांसाठी प्रति चौरस फुट ₹50 पर्यंत लाच घेतल्याचं धक्कादायक उघड!
ईडीच्या तपासानुसार, वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरातील तब्बल 5.51 कोटी चौरस फुट बांधकाम क्षेत्राला बेकायदेशीर परवानगी देण्यात आली. ग्रीन झोनमध्येही बांधकामांना परवानगी देण्याचा भयंकर गैरव्यवहार उघड! कमेन्समेंट सर्टिफिकेट्स, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट्स, बदललेली विकास परवानगी आणि बेकायदेशीर बांधकामांना संरक्षण देण्यासाठी ठराविक दराने मोठ्या प्रमाणात लाच वसूल!
ईडीच्या दस्तऐवजांनुसार, पवार-रेड्डी गटाने बांधकाम माफिया व बिल्डर लॉबीशी संगनमत करून संगठित लाचखोरीचे जाळं उभारलं! इतकंच नाही, या प्रचंड लाचखोरीतील काही रक्कम परदेशात वळवली गेल्याचा मोठा संशय व्यक्त — आंतरराष्ट्रीय चौकशीचीही शक्यता!
वसई-विरार परिसरातील नागरिक संतप्त! वर्षानुवर्षं अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळत असल्याचे आरोप आधीपासूनच; मात्र ईडीच्या धडक कारवाईनंतर या महाघोटाळ्याचे ठोस पुरावे समोर आल्याने शहरात प्रचंड खळबळ!




