Home Latest News शहरातील नागरिकांना चावलेल्या कुत्र्यांचा औषध व उपचाराचा खर्च मनपाने करावा : विशाल...

शहरातील नागरिकांना चावलेल्या कुत्र्यांचा औषध व उपचाराचा खर्च मनपाने करावा : विशाल कोरके

0
42
 
 
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जलद गतीने करण्याची मागणी
नागपूर २२ : नागपूर शहरात भटक्या मोकळ्या कुत्र्यांनची संख्या असंख्य वाढलेली असून झुंडच्या-झुंड नागरिकांचे लचके तोडत असताना म.न.पा.प्रशासन सुस्त निष्काळजी व फक्त बघ्याची भूमिका घेत असून सामान्य जनतेचे हाल होत असताना नको त्या कार्यावर मनपाद्वारे खर्च केला जातो. तर नागपूर शहरातील नागरिक कुत्र्यांनी त्रस्त असताना महानगरपालिकेने याकडे गंभीरतेने लक्ष देत कुत्रा चावलेल्या नागरिकांनचा संपूर्ण औषधे व उपचाराचा खर्च मनपाने करावा. तसेच मेडिकल व्यतिरिक्त प्रत्येक विधानसभा क्षेत्र दोन ते तीन अतिरिक्त दवाखाने मोफत तत्वावर नेमून द्यावेत. जेणेकरून जनतेला दवाखान्यात भटकावे लागणार नाही. मनपा हद्दीत येणाऱ्या प्रत्येक  दवाखान्यांना नागरिकास  कुत्रा चावल्यास उपचार करण्यास बाद्य करावे. ही मागणी शिवसेना दक्षिण नागपूर विधानसभा संघटक विशाल कोरके यांनी मनपा पशुवैद्यकीय अधिकारी मनपा डॉ. गजेंद्र महल्ले यांना निवेदन देऊन करण्यात आली तसेच भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त जलद गतीने करण्याची मागणी केली याप्रसंगी नीलिमा शास्त्री धम्म सोनटक्के, उज्वला उंमरे नलिनी सदावरती किशोर रंदई, विनोद चकोर, मनीषा नागमोते सोनाली उंमरे, आरती शर्मा, शितल टिकले आदि उपस्थित होते.