खेडी (खोपडी) गावात 200 मुलांना शैक्षणिक सामग्री वाटप करून तान्हा पोळा केला साजरा

0
56
किशोर साहू: मौदा, ता २५:दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवार ( दि. 23 ऑगस्ट)ला तान्हा पोळा महोत्सव निमित्त मौदा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या व पारशिवनी तालुक्या अंतर्गत येत असलेल्या खेडी गावामध्ये युवा मित्र परिवार खेडी तर्फे 200 मुलांना शैक्षणिक सामग्री वाटप करण्यात आले. युवा मित्र परिवार  स्वप्नील चौधरी, जितेंद्र वैद्य,आकाश कोचे, सुशील ठाकरे, श्रीकृष्णा काळे,प्रफुल सांभारे, संकेत मोकरकार, दुर्गेश मेश्राम,गौरव काळे, तुकेश घरजाळे,चक्रधर वासनिक,अमोल नागपुरे, राजेंद्र नागपुरे, ऋषभ वैद्य, रामेश्वर नागपूरे, आकाश इंगळे, वैभव काळे, कपिल वासनिक, मनोज कडू, विशाल चौधरी, रुपेश श्रीरामे, अमोल उईके, हरिचंद्र चौधरी, अतुल पुंड, श्रीकांत चौधरी, दीपक इंगळे, नितेश घरजाळे, प्रफुल काळे, श्यामा ठाकरे, आकाश वैद्य इत्यादीने मोलाचे सहकार्य केले व तान्हा पोळा मोठा उत्साहाने लहान मुलांमध्ये शिक्षणाच्या प्रचार व प्रसार करण्याच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.