अध्यक्षपदी ब्रह्माशंकर त्रिपाठी तर सरचिटणीसपदी अनुपम सोनी
नागपूर २५ : श्रमिक पत्रकार संघाच्या निवडणुकीत पुढील कार्यकारिणी अविरोध निवडून आली. नव्या कार्यकारिणीचा कार्यकाळ हा 2025 ते 2027 असा राहील.
नव्या कार्यकारिणीत, अध्यक्ष-ब्रह्माशंकर त्रिपाठी (लोकमत टाईम्स), उपाध्यक्ष -अनंत मुळे (तरुण भारत) व परितोष प्रामाणिक (हितवाद), सरचिटणीस – अनुपम सोनी (हितवाद), कोषाध्यक्ष- मोरेश्वर मानापुरे (लोकमत), सहसचिव -अभिषेक तिवारी (नवभारत), संघटन सचिव -सुनील सोनी (लोकमत समाचार), कार्यकारिणी सदस्य -राजश्री यादव (लोकमत समाचार), हितेश लिंबाचिया (हितवाद), आनंद मोहरील (तरूण भारत), निखिल दीक्षित (हितवाद), हेमंत सालोडकर (तरुण भारत) व किरण राजदेरकर (तरुण भारत) यांचा समावेश आहे. ज्येष्ठ पत्रकार शिरीष बोरकर यांनी मुख्य निवडणूक अधिकारीपदाची तर वर्षा बाशू यांनी सहाय्यक निवडणूक अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळली.




