किशोर साहू: मौदा, ता.२५ : जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शनिवार (दि.23) ला संध्याकाळी 4:30 वाजता गट ग्रामपंचायत दहेगाव उपसरपंच ढोमणे , माजी सरपंच संदीप आंबिलढुके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश निरगुळकर ,उपाध्यक्ष प्रल्हाद वैद्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु. पठाण तबस्सुम , ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ गिर्हेपुंजे , पोलीस पाटील प्रशांत वाडीभस्मे , सामाजिक कार्यकर्ते चंद्रमणी पाटील व मान्यवरांच्या उपस्थितीत एकत्रित सहभागातून तान्हा पोळा साजरा करण्यात आला. शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला .


